Thursday, December 24, 2020

धीरूभाई अंबानी.....३०० रु महिन्याचा पगार कमविणारे कसे बनले उद्योगजगताचे बादशहा

 धीरूभाई अंबानी.....Success Story  Of  dhirubhai Ambani मराठीत 

ह्यादेशात लहानांपासून ते मोठ्यापर्यंत  असा  क्वचितच कोणी असेल जो धीरूभाई अंबानी ह्या नावाशी अपरिचित असेल. रिलायन्स  उद्योग समूहाचे  संस्थापक  प्रमुख धीरूभाई अंबानी म्हणजेच एकेकाळी भारतीय उद्योग जगताचे जणू बादशहाच .सन  २००० साली देशाचे सर्वांत श्रीमंत व्यक्ति म्हणून  ते समोर आले.  ६ जुलै २००२ साली स्ट्रोक ने त्यांचे निधन झाले एका रिपोर्ट नुसार त्यांच्या निधनाच्या वेळी रिलायन्स ६२ हजार करोड ची कंपनी बनलेली होती . धीरूभाई अंबानींनी  मेहनत ,जिद्द  व चिकाटीच्या  जोरावर जी प्रगती केली त्यामुळे भारतातील अनेक युवा त्यांना आपला प्रेरणास्त्रोत मानतात. ते केवळ भारतातीलच नाहीतर  जगातील महान प्रेरणादायी व्यक्ती मध्ये एक समजले जातात . सामान्य पगारदार माणूस धीरजलाल  भारतीय उद्योग जगताचा बादशहा  धीरूभाई कशे  बनले  जाणून घेऊया

सुरुवातीचे जीवन  ....

धीरजलाल हिराचंद अंबानी  म्हणजेच धीरूभाई  यांचा जन्म २३ दिसेम्बर १९३३ गुजरात च्या जुनागढ जिल्ह्या तील  चोरवाड  ह्या गावी येथे झाला ,त्याच्या वडिलांचे नाव हिराचंद व आईचे नाव जमानाबेन होते. त्यांचे वडील हिराचंद  अंबानी  हे पेशाने शिक्षक  होते .त्यांना  चार बहीण भाऊ होते ,ऐवढा मोठा परिवार असल्याने त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती काही ठीक नव्हती त्यामुळे  हाईस्कूल चे शिक्षणच  त्यांना करता आले .मधात शिक्षण सोडून त्यांना वडिलांना हातभार लावावा लागला . सुरुवातीला  त्यांनी मिळेल ते काम करणे सुरु केले  परंतु तरीही त्यात भागत नव्हते ,त्यामुळे त्यांनी  फळे  व नाश्ता विकणे सुरु केले,त्यातूनही  काही विशेष फायदा झाला नाही म्हणून त्यांनी गावाजवळ असलेल्या पर्यटनस्थली भजे -पकोडे विकणे सुरु केलं . कधी  चांगला फायदा तर कधी काहीच नाही अश्या परिस्थितीत तेही बंद केले . शेवटी त्यांनी नौकरी करण्याचा निर्णय घेतला. 

पहिली नौकरी ....... 

अधिक पैसे कमविण्यासाठी  वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षी  त्यांचा भाऊ रामाणीकलाल यांच्या कडे  यमन येथे निघून गेले .तिथे त्यांना एका पेट्रोल पंपावर ३०० रुपये महिन्याची नौकरी मिळाली . अवघ्या दोन वर्षातच त्यांच्या कामातील जिद्द पाहून कंपनी मालकाने त्यांना फिलिंग स्टेशन मध्ये मॅनेजर म्हणून बढती  दिली . काही वर्ष काम केल्या वर स्वतः उद्योजक होण्याचे त्यांनी मनात ठरविले ,त्यासाठी ते नवनवीन संभावना पडताळून पाहायचे  .कुठून काय शिकता येईल ह्याकडे सद्यवा त्यांचे लक्ष असायचे .उद्योजक बनण्याचे त्यांचे स्वप्न एवढे मोठे होत्ये कि त्यासाठी ते खास व्यापारी ज्या हॉटेल मध्ये व्यापाराविषयी चर्चा करत बसायचे तिथे ते अधिक पैसे देऊन चहा प्यायला जायचे ,जिथे  बसून ते  व्यापाऱ्यांच्या बिझिनेसच्या गप्पा  ऐकायचे . तिथूनच ते व्यापाराचे गुण शिकले. यमन मध्ये ५० च्या दशकात स्वत्रंतता  आंदोलन सुरु झाले त्यामुळे अनेक भारतीयांना तेथील नौकऱ्या गमावून मायदेशी परत यावे लागले  धीरूभाई हि त्यातील एक होते.  

रिलायन्स ची सुरुवात ....... 

काही तरी मोठ कराव ह्या जिद्दीने ते १९५४ मध्ये भारतात ५०० रुपये घेवून परत आले. यमन मध्ये काम करत असताना त्यांना बिझिनेस ची समज  येणे सुरु झाली होती. भारतात पॉलिस्टर ची त्यावेळी चांगलीच डिमांड होती त्याच बरोबर विदेशात भारतीय मसाल्यांना प्रचंड मागणी होती . ह्यामुळेच त्यांना बिझिनेस ची आयडिया आली,मावसभाऊ चंपकलाल दमाणी ह्यांना सोबत घेऊन त्यांनी रिलायन्स कॉमर्स कार्पोरेशन हि कंपनी स्थापन केली .मुंबई  मस्जिद बंदर भागातील नरवाडिया स्ट्रीट  येथील ३५० स्क्वेअर फूट ची रूम त्यात एक टेबल ,तीन खुर्च्या  ,एक टेलिफोन आणि दोन सहकारी  एवढ्यात त्यांनी त्यांचे ऑफिस थाटले होते.ज्याच्या माध्यमातून त्यांनी विदेशातील पॉलिस्टर भारतात आणि भारतातील मसाले विदेशात विकायला सुरुवात केली .  



धीरूभाई अंबानी.....३०० रु महिन्याचा पगार कमविणारे कसे बनले उद्योगजगताचे बादशहा

  धीरूभाई अंबानी..... Success Story  Of  dhirubhai Ambani मराठीत  ह्यादेशात लहानांपासून ते मोठ्यापर्यंत  असा  क्वचितच कोणी असेल जो धीरूभाई अ...